तेव्हा आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, हे ही शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
Cross references
तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता!
“आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे.
शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे वडील दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करुन दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते
शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.
“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, व मी तुला नावाने हाका मारत आहे.
“तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे केले. दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.”मी (यिर्मयाने) ‘होय, परमेश्वरा!’ म्हणून पुष्टी दिली.