Home Bibles 2 इतिहास 6:13 · मराठी बायबल
2 इतिहास 6:13 · मराठी बायबल

बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले

Cross references

निर्गम 9:29

मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.

1 राजे 6:36

मग आतला चौक बांधला. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि देवदाराची एक ओळ अशा त्या भिंती होत्या.

1 राजे 7:12

महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.

1 राजे 8:54

शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.

2 इतिहास 4:9

याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक आवार केले, एक प्रशस्त आवार आणि त्यांना दरवाजे केले. आवारांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.

एज्रा 9:5

होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो.

नहेम्या 1:4

यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.

नहेम्या 8:4

एज्रा एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.

स्तोत्रसंहिता 95:6

चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.

दानीएल 6:10

दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली.

लूक 22:41

तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले. आणि अशी प्रार्थना केली,

प्रेषितांचीं कृत्यें 20:36

आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.

प्रेषितांचीं कृत्यें 21:5

आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरु केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहरबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.

Interlinear

Choose Theme