त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परीघ 30 हात होता.
Cross references
“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली.
दर्शन मंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्त्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
यानंतर हिरामने पंच धातूचा एक गोल हौद केला. याला त्याने “समुद्र” असे नाव दिले. याचा परिघ पंचेचाळीस फूट होता. या काठापासून त्या काठापर्यंत त्याची लांबी पंधरा फूट होती आणि खोली साडेसात फूट.
टिमथ आणि कून या नगरांमधील पितळही हस्तगत केले. ही नगरे देखील हदरेजरच्याच आधिपत्याखाली होती. पुढे हे पितळ वापरुन शलमोनाने मंदिरासाठी गंगाळ स्तंभ आणि इतर वस्तू करवल्या.
त्यावेळी दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पाण्याचा नवा झरा फुटेल. त्याचा उपयोग लोकांची पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी होईल.
त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो.
मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.