2 इतिहास 4:17 · मराठी बायबल
या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे नमुने बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
Cross references
1 राजे 7:46
या सगाळ्यासाठी किती पितळ लागले ते राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व चीजवस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.