आपले वडील किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
Cross references
त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
“पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.
देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वत:ला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला.
म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.