यरुशलेममधील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करुन राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.
Cross references
“तू इस्राएल लोकांना हे सर्व सांग की हा नियम तुम्हा करिता व तुमच्या वंशजाकरिता आहे; प्रेताला स्पर्श झाल्यामुळे एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस त्यावेळी दूरच्या प्रवासात असेल व म्हणून त्याला ठरलेल्यावेळी वल्हांडण सण पाळता येत नसेल तरी;
त्याला वल्हांडण सण पाळता येईल; त्याने तो दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी संधी प्रकाशात साजरा करावा. त्यावेळी त्याने अर्पण केलेले कोंकरु, बेखमीर भाकर व कडू भाजीपाला हे खावे;
इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता.
दावीद आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलला.
शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला.
दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरुशलेममध्ये जमले. तो एक विशाल समुदाय होता.
दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बळी दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
राजा योशीयाने यरुशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरोच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो.
जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.
गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.