Home Bibles 2 इतिहास 29:6 · मराठी बायबल
2 इतिहास 29:6 · मराठी बायबल

आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.

Cross references

2 इतिहास 28:2

इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या.

2 इतिहास 28:23

दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.

2 इतिहास 34:21

“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”

एज्रा 5:12

आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले.

एज्रा 9:7

आमच्या वाडवडीलांच्या वेळे पासून आतापर्यंत आम्ही अनेक पापांचे दोषी आहोत. आमच्या पापांची शिक्षा आमचे राजे आणि याजक यांना भोगावी लागली. परकी राजांनी आमच्यावर आक्रमण करुन आमच्या लोकांना पकडून नेले. आमची संपत्ती लुटून त्या राजांनी आम्हाला लज्जित केले आजही तेच चालले आहे.

नहेम्या 9:16

पण आमचे पूर्वज अन्मत्त झाले. अहंमन्य बनले, आणि त्यांनी तुझ्या आज्ञांचे पालन करायचे नाकारले.

नहेम्या 9:32

हे देवा, तू महान देव आहेस. दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस तू निष्ठा बाळगणारा आहेस. तू करार पाळतोस आमच्यावर अनेक आपत्ती आल्या आणि आमच्या अडचर्णीना तू महत्व देतोस आम्ही सर्वजण, आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.

नहेम्या 9:34

आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या खबरदारीच्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.

यिर्मया 2:13

“माझ्या लोकांनी दोन पापे केली. ते माझ्यापासून दूर गेले. (मी जिवंत पाण्याचा झरा आहे.) आणि त्यांनी स्वत:ची पाण्याची टाकी खोदली. (ते दैवंताकडे वळले.) पण ती टाकी फुटली आहे. त्यात पाणी राहू शकत नाही.

यिर्मया 2:17

तुमच्याच चुकीने हे संकट आले आहे. परमेश्वर तुमचा देव तुम्हाला योग्य मार्गाने नेत होता. पण तुम्हीच उलटे फिरलात.

यिर्मया 2:27

ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला ‘माझे वडील’ म्हणतात. ते खडकाशी बोलतात. ते म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील. ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत. त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे. पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात, तेव्हा ते मला म्हणतात, ‘ये आणि आम्हाला वाचव.’

यिर्मया 16:19

परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. जगाच्या सर्व भागांतून राष्ट्रे तुझ्याकडे येतील. ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांनी खोटे देव जवळ बाळगले. त्या दीडदमडीच्या मूर्तींची पूजा केली. पण त्या मूर्तींनी त्यांना काहीही मदत केली नाही.”

यिर्मया 44:21

तो त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर बळी दिले हे परमेश्वराच्या लक्षात आहे. तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी, राजांनी, अधिकाऱ्यांनी व देशातील लोकांनी असेच केले परमेश्वराच्या लक्षात हे सर्व होते. त्याने त्याबद्दल विचार केला.

विलापगीत 5:7

आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.

यहेज्केल 8:16

मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते.

दानीएल 9:16

परमेश्वरा तू योग्य त्याच गोष्टी करतोस. तू न्याय जाणतोस. त्यानुसार तुझे शहर जे यरुशलेम त्याच्यावरचा तुझा राग काढून घे. यरुशलेम हा तुझा पवित्र पर्वत आहे. आमच्या सभोवतालचे लोक आमचा अपमान करतात आणि तुझ्या लोकांची चेष्टा करतातय. ह्याचे कारण आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले, हेच होय.

मत्तय 10:37

“जो माझ्यापेक्षा स्वत:च्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही.

मत्तय 23:30

आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती.

Interlinear

Choose Theme