2 इतिहास 29:19 · मराठी बायबल
राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुध्दी करुन आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”
Cross references
2 राजे 16:14
आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
2 राजे 16:17
आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला.
2 इतिहास 28:24
आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणी गोळा करुन त्यांची मोडतोड करुन विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करुन घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेममध्ये चौका चौकात बसवल्या.