Home Bibles 2 इतिहास 26:3 · मराठी बायबल
2 इतिहास 26:3 · मराठी बायबल

उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुशलेमवर 52वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या. ती यरुशलेमची होती.

Cross references

2 राजे 15:2

तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती.

यशया 1:1

आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा व यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.

यशया 6:1

उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते.

होशेय 1:1

बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. व योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.

आमोस 1:1

आमोस तकोवा नगरीतील मेंढपाळ होता. यहूद्यांचा राजा उज्जीया आणि इस्राएलचा राजा यराबाम यांच्या कारकिर्दीत आमोसला दृष्टांन्त झाले. यराबाम योवाशाचा मुलगा होता हे दृष्टांन्त भूकंपाच्या आधी दोन वर्षे झाले त्याचा हा संदेश.

जखऱ्या 14:5

दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.

Interlinear

Choose Theme