Home Bibles 2 इतिहास 25:24 · मराठी बायबल
2 इतिहास 25:24 · मराठी बायबल

सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.

Cross references

2 राजे 14:14

पण परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशने लुटाली. तसेच येथील सर्व माणसांना बंदिवान केले. मगच तो शोमरोनला परतला.

1 इतिहास 26:15

ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले.

2 इतिहास 12:9

शिशकने यरुशलेमवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या.

Interlinear

Choose Theme