2 इतिहास 25:10 · मराठी बायबल
तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहुदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागानेच घरी परतले.
Cross references
2 शमुवेल 19:43
इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्सेआहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत. असे का? राजाला पुन्हा गादीवर बसवायचे आम्हीच आधी बोललो होतो.”पण यहूदींनी इस्राएल लोकांना यावर अतिशय तुच्छतेने उत्तर दिले. इस्राएल पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.
1 राजे 12:24
“आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. सर्वजण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो.”‘ या आदेशानुसार रहबामचे सैन्य माघारी गेले.
नीतिसूत्रे 29:22
रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.