या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले.
Cross references
शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले,
दावीद म्हणाला, “आपण परमेश्वरासाठी भव्यमंदिर उभारले पाहिजे. पण माझा मुलगा शलमोन अजून लहान आहे. त्याचे शिक्षणही अद्याप पुरे झालेले नाही. परमेश्वराचे मंदिर मात्र उत्कृष्ट झाले पाहिजे. असे देखणे आणि भव्य की सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याची कीर्ती व्हायला हवी. त्यदृष्टीनेच मी परमेश्वराच्या मंदिराची योजना आखीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी मंदिर उभारणीची बरीच तयारी केली.
पण सनबल्लट तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
“तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना?
येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”