Home Bibles 2 इतिहास 23:10 · मराठी बायबल
2 इतिहास 23:10 · मराठी बायबल

आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपापले शस्त्र होते. मंदिराच्या थेट उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.

Cross references

निर्गम 40:6

“दर्शन मंडपाच्या म्हणजे पवित्रनिवास मंडपाच्या दारापुढे होमार्पणासाठी वेदी ठेव.

2 राजे 11:11

मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.

2 इतिहास 6:12

शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.

योएल 2:8

ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात.

Interlinear

Choose Theme