अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा. योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला.
Cross references
यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
अहाबाचा मुलगा यहोराम हा शोमरोन मध्ये इस्राएलचा राजा म्हणून सत्तेवर आला. यहोशाफाटचे ते यहूदाचा राजा म्हणून अठरावे वर्ष होते. यहोरामने बारा वर्षे राज्य केले.
तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामचा राजा बेनहदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”
अहाबचा मुलगा योराम याच्या बरोबर अहज्या रामोथ गिलाद येथे अरामचा राजा हजाएल याच्यावर चढाई करुन गेला. अराम्यांनी योरामला जखमी केले. तेथे झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी म्हणून राजा योराम इस्राएलला परत गेला. इज्रेलच्या प्रदेशात तो गेला. त्याला भेटायला यहोरामचा मुलगा अहज्या ही इज्रेलला गेला.
अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा.
अहाब त्याला म्हणाला, “रामोथगिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्याला म्हणाला, “तू आणि मी काही वेगले नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.”
त्या सरदारांनी यहोशाफाटला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून त्यांनी यहोशाफाटकडे मोहरा वळवला. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता. तो यहोशाफाटला सामोरा गेला. येहू यहोशाफाटला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूचआहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस.
का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता. अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता. तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता. म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन. तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील. माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून नेले जातीलइतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील. ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.