Home Bibles 2 इतिहास 21:6 · मराठी बायबल
2 इतिहास 21:6 · मराठी बायबल

अहाबच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या राहणीला अनुसरुनच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या मुलीशी यहोरामने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या.

Cross references

1 राजे 12:28

त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”

1 राजे 16:25

अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.

2 राजे 8:18

पण इस्राएलच्या इतर राजांप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची बायको अहाबची मुलगी होती म्हणून त्याने तसे केले.

2 इतिहास 18:1

यहोशाफाटला भरपूर धनदौलत आणि मानसन्मान मिळाला. राजा अहाबच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्याच्याशी सलोखा केला.

2 इतिहास 20:35

इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.

2 इतिहास 22:2

त्यावेळी तो बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. तिच्या वडलांचे नाव अम्री.

2 इतिहास 28:2

इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या.

नहेम्या 13:25

तेव्हा मी त्या पुरुषांना त्यांचा हा दोष दाखवला. त्यांचा मी धिक्कार केला. काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावली. त्यांना मी म्हणालो, “त्या लोकांच्या मुलींशी लग्ने करु नका. तुमच्या मुलांशी या परक्या लोकांच्या मुलींची लग्ने होऊ देऊ नका. तुमच्या मुलींना त्या परक्या लोकांच्या मुलांशी लग्ने करु देऊ नका.

Interlinear

Choose Theme