ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’
Cross references
“माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन व तुम्हाला आशीर्वाद देईन.
तुम्ही त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या मागे चाला; त्याच्याविरुद्ध बंड करु नका. तुम्ही त्याच्या विरुद्ध काही चुकीच्या गोष्टी कराल तर तो तुम्हांला क्षमा करणार नाही; माझे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे.
परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.
“कधी इस्राएलच्या लोकांच्या हातून पाप घडले तर शत्रू त्यांचा पराभव करील. अशा वेळी हे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन या मंदिरात प्रार्थना करतील, तुझी स्तोत्रे गातील.
“कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही. किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड येऊन सगळे पीक फस्त करील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील. किंवा एखाद्या दुख्याने लोक हैराण होतील.
‘माझ्या लोकांना मी मिसरमधून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.
या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.
“कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास
तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.
एज्रा प्रार्थना करत असताना आणि पापांची कबुली देत असताना मंदिरापुढे पडून आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते ही सर्वजण आक्रंदन करत होते
देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”