Home Bibles ☰ Books 2 इतिहास 18:8 · मराठी बायबल
2 इतिहास 18:8 · मराठी बायबल

तेव्हा अहाबने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा मुलगा मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”

Cross references

1 शमुवेल 8:15

धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल.

1 राजे 22:9

तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.

1 इतिहास 28:1

राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.

2 इतिहास 18:25

राजा अहाब म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा

यशया 39:7

तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”

दानीएल 1:3

नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.

दानीएल 1:7

नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.

Interlinear

Choose Theme