Home Bibles 2 इतिहास 18:33 · मराठी बायबल
2 इतिहास 18:33 · मराठी बायबल

पण कोण्याएका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नेमका चिलखताच्या सांध्यातून अहाबच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”

Cross references

2 शमुवेल 15:11

अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली. यरुशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती.

1 राजे 22:34

तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हाता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”

2 इतिहास 35:23

या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.”

Interlinear

Choose Theme