Home Bibles 2 इतिहास 17:2 · मराठी बायबल
2 इतिहास 17:2 · मराठी बायबल

त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.

Cross references

2 इतिहास 11:5

रहबाम यरुशलेममध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात उभाली.

2 इतिहास 11:11

नगरे मजबूत झाल्यावर रहबामने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला.

2 इतिहास 13:19

अबीयाच्या सैन्याने यारबामच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामकडून अबीयाच्या सैन्याने बळकावला.

2 इतिहास 15:8

आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.

2 इतिहास 17:19

ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

Interlinear

Choose Theme