Home Bibles 2 इतिहास 14:8 · मराठी बायबल
2 इतिहास 14:8 · मराठी बायबल

आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील 3,00,000 जण आणि बन्यामिन वंशातील 2,80000 लोक होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्य-बाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.

Cross references

1 इतिहास 8:40

ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते.हे सर्व बन्यामीनचे वंशज.

2 इतिहास 11:1

यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली.

2 इतिहास 11:8

गथ, मारेशा, सीफ,

2 इतिहास 12:2

रहबामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.

2 इतिहास 12:3

शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुकृीव कुशी हे लोक होते.

2 इतिहास 13:3

अबीयाच्या सैन्यात 400,000 शूर योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामकडे 800,000 सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.

2 इतिहास 16:8

कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.

2 इतिहास 17:14

आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे: यहूदातील सरदार असे: अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.

2 इतिहास 20:1

यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनीलोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आहे.

2 इतिहास 25:5

अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी वय वर्षे किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढाली या आयुधांनी सज्ज असे सैनिक त्याने मोजले. ते एकंदर 3,00,000 निवडक सैनिक युध्दाला तयार होते.

Interlinear

Choose Theme