Home Bibles 2 इतिहास 14:2 · मराठी बायबल
2 इतिहास 14:2 · मराठी बायबल

आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने न्याय्य आणि उचित असा कारभार केला.

Cross references

निर्गम 23:24

“परंतु या सर्व लोकांच्या दैवतांची पूजा करु नका; त्यांना नमन करु नका; त्याच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही कधीही वागू नये; त्यांच्या मूर्तीचा तुम्ही नाश करावा, आणि त्यांच्या मूर्तीच्या स्मारकांचे दगड व स्तंभ तोडून फोडून टाकावे.

अनुवाद 12:3

तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.

1 राजे 15:11

आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.

1 राजे 15:14

उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.

2 इतिहास 17:6

परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.

2 इतिहास 20:32

आपले वडील आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. तो मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटने केले.

2 इतिहास 31:1

अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरुशलेममध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या. या खोट्या नाट्या दैवतांची पूजा होत असे. अशेराचे खांबही त्यांनी उखडून टाकले. यहूदा आणि बन्यामिन प्रांतातील सर्वच्यासर्व उंच स्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. गैर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.

2 इतिहास 31:20

राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.

2 इतिहास 34:7

मूर्तिंभंजन, अशेरा खांबांची मोडतोड, वेद्यांचा विध्वंस बआलदेवतेच्या धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरुशलेमला परतला.

लूक 1:75

त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.

Interlinear

Choose Theme