Home Bibles 1 तीमथ्याला 6:15 · मराठी बायबल
1 तीमथ्याला 6:15 · मराठी बायबल

जोे धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील.

Cross references

एज्रा 7:12

राजा अर्तहशश्त कडून,याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास,अभिवादन!

स्तोत्रसंहिता 47:2

सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.

स्तोत्रसंहिता 83:18

नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.

स्तोत्रसंहिता 136:3

परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

नीतिसूत्रे 8:15

राजे राज्य करताना माझा उपयोग करतात. राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.

यिर्मया 10:10

पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.

यिर्मया 46:18

हा राजाकडून आलेला संदेश आहे. तो राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरच होय. “मी शपथपूर्वक वचन देतो की सामर्थ्यवान नेता येईल. तो ताबोर आणि समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे महान असेल.

दानीएल 2:44

चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.

दानीएल 4:34

ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.

मत्तय 6:13

आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’

1 तीमथ्याला 1:11

गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपविली आहे, तिला हे अनुसरून आहे.

1 तीमथ्याला 1:17

आता अनंतकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला माहिमा आणि गौरव अनंतकाळसाठी असो. आमेन.

1 तीमथ्याला 2:6

सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वत:ला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्षा दिली.

प्रकटीकरण 17:14

ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”

प्रकटीकरण 19:16

त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:

Interlinear

Choose Theme