Home Bibles ☰ Books 1 तीमथ्याला 3:10 · मराठी बायबल
1 तीमथ्याला 3:10 · मराठी बायबल

वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग जर त्यांच्या विरुद्ध असे आढळले नाही, तर त्यांनी मदतनीसाचे काम करावे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 6:1

अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते.

1 करिंथकरांस 1:8

तो सुद्धा आपल्या प्रभु येशूच्या दिवशी शेवटपर्यंत तुम्हांस निर्दोष असे प्रस्थापित करील.

कलस्सैकरांस 1:22

परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे.

1 तीमथ्याला 3:2

आता अध्यक्षाने (सर्वागीण काळजीवाहकाने) त्याचे जीवन लोकांनी टीका करु नये अशा रीतीने जगावे. त्याला एकच पत्नी असावी.

1 तीमथ्याला 3:6

तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून जाणार नाही. व सैतानाला जशी शिक्षा झाली तशी शिक्षा होऊन त्याचा अंत होणार नाही.

1 तीमथ्याला 3:13

कारण मदतनीस म्हणून जे चांगली सेवा करतात, ते त्यांच्यासाठी आदरणीय स्थान मिळवितात आणि ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्या विश्वासात महान आत्मविश्वास मिळवितात.

1 तीमथ्याला 5:22

देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वत:ला शुद्ध राख.

तीताला 1:6

ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे.

1 योहान 4:1

प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांचीपरीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघालेआहेत.

Interlinear

Choose Theme