Home Bibles 1 शमुवेल 9:2 · मराठी बायबल
1 शमुवेल 9:2 · मराठी बायबल

कीशाला शौल नावाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेपणात आणि उंचीच्या बाबतीत इस्राएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इस्राएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.

Cross references

उत्पत्ति 6:2

त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.

गणना 13:33

आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”

1 शमुवेल 10:21

व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मात्रीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला समोरुन जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली.पण लोकांना शौल कुठे दिसेना.

1 शमुवेल 10:23

लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता.

1 शमुवेल 16:7

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

1 शमुवेल 17:4

पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षाजास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला.

2 शमुवेल 14:25

अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरुन प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याचा देह नखशिखान्त निर्दाष, नितळ होता.

1 इतिहास 8:33

कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.

यिर्मया 9:23

परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो.

Interlinear

Choose Theme