Home Bibles 1 शमुवेल 8:14 · मराठी बायबल
1 शमुवेल 8:14 · मराठी बायबल

“तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील.

Cross references

1 शमुवेल 22:7

शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का?

1 राजे 21:7

ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”

1 राजे 21:19

अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”

यहेज्केल 46:18

राजा कोणाही माणसाची जमीन घेणार नाही अथवा कोणालाही सक्तीने जमीन सोडायला लावणार नाही. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणजे माझ्या लोकांना सक्तीने जमीन सोडावी लागणार नाही.”

Interlinear

Choose Theme