Home Bibles 1 शमुवेल 8:12 · मराठी बायबल
1 शमुवेल 8:12 · मराठी बायबल

काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.

Cross references

1 शमुवेल 22:7

शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का?

1 राजे 4:7

इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य

1 राजे 4:22

शमोनाला त्याच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांसाठी दररोजच खालील अन्नपदर्थ लागत दीडशे बुशेल मैदा तीनशेबुशेल कणीक दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, रहण, सांबर, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.

1 राजे 4:27

शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.

1 इतिहास 27:1

राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.

2 इतिहास 32:28

धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या यांच्यासाठी कोंडवाडे बांधले.

Interlinear

Choose Theme