Home Bibles 1 शमुवेल 7:10 · मराठी बायबल
1 शमुवेल 7:10 · मराठी बायबल

हा होम चालू असताना पलिष्ट्यांनी इस्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रंचड गडगडाट करुन परमेश्वराने पलिष्ट्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रंचड गर्जनेमुळे घाबरुन ते गोंधळले. सेनापतींचा सैन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इस्राएलींनी त्यांचा पराभव केला.

Cross references

निर्गम 9:23

तेव्हा मोशेन आपली काठी आकाशकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.

अनुवाद 20:3

ती अशी, ‘इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करुन जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. उभारी कायम ठेवा. शत्रूला घाबरु नका.

अनुवाद 28:7

“तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल.

यहोशवा 10:10

परमेश्वराने इस्राएलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली. इस्राएल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोनपासून बेथ-होरोनच्या वाटेपर्यंत इस्राएलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला, आणि अजेका व मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले.

शास्ते 4:15

त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला.

शास्ते 5:8

नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले.तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.

शास्ते 5:20

स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले.

1 शमुवेल 2:10

शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”

1 शमुवेल 12:17

सध्या गव्हाच्या कापणीचे दिवसआहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.”

2 शमुवेल 22:14

परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला

स्तोत्रसंहिता 18:11

परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.

स्तोत्रसंहिता 18:15

परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.

स्तोत्रसंहिता 77:16

देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल पाणी भयाने थरथरले.

स्तोत्रसंहिता 78:66

देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला. देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.

स्तोत्रसंहिता 97:3

अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.

जखऱ्या 4:6

मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

प्रकटीकरण 16:18

मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवरअसल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता.

Interlinear

Choose Theme