सोन्याचे उंदीरही करुन पाठवले. पाच पलिष्टी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संख्येच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावाभोवती तटबंदी असून सभोवार खेडी होती.बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशवाच्या शेतात तो खडक अजूनही आहे.
Cross references
या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याशिवाय तट नसलेली गावे पुष्कळच होती.
मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.
बेथशेमेश येथील यहोशवाच्या शेतात येऊन एका मोठ्या खडकापाशी गाडी थांबली. स्थानिक लोकांनी त्या गाडीची लाकडे फोडली आणि गाईचा बळी दिला. परमेश्वराला तो अर्पण केला. लेवींनी मग परमेश्वराचा पवित्र कोश उतरवला. तसेच सुवर्ण प्रतिमांची थैली घेतली. कोश आणि ती थैली त्या प्रचंड खडकावर ठेवली. बेथशेमेशच्या लोकांनी त्या दिवशी परमेश्वराला यज्ञार्पणे वाहिली.