दावीद त्याला म्हणाला, “आमच्या बायकामुलांना तुम्ही नेलेत तिथे मला घेऊन जाशील का?”तेव्हा तो मिसरी दास म्हणाला, “तुम्ही परमेश्वरापुढे शपथ घेतलीत तर मी तुम्हाला मदत करीन. पण तुम्ही मला मारणार नाही किंवा माझ्या धन्याकडे देणार नाही असे मला वचन द्या.”
Cross references
आणि आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर याजसमोर मला वचन दे की माझा मुलगा इसहाक याला तू कनान देशातील कोणत्याच मुलीबरोबर लग्न करु देणार नाहीस; आपण या कनान देशात राहतो हे खरे परंतु या देशातील कोणत्याच मुलीबरोबर त्याला लग्न करु देणार नाहीस.
“एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका.
तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या.
यहोशवाने त्यांच्याशी शांततेचा करार करण्याचे मान्य केले. त्यांना जीवदान दिले. यहोशवाने दिलेल्या वचनाशी इस्राएलांची वडीलधारी मंडळीही सहमत झाली.
पण पंच म्हणाले, “आम्ही खुद्द इस्राएलाच्या परमेश्वर देवासमोर त्यांना आपला शब्द दिला आहे. तेव्हा आता त्यांच्याविरूध्द लढता येणार नाही.
ती करत असताना त्यांना एक माणूस नगराबाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धक्का लावणार नाही.”
तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझ्याशी सचोटीने वागला आहेस. माझ्या सैन्यात तुला भरती करुन घेणे मला आवडले असते. तू मला सामील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपाई काही आढळले नाही. पण पलिष्टी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही.
मग नबुखद्नेस्सरने राजघराण्यातील एका माणसाबरोबर करार केला. त्याने त्याच्याकडून सक्तीने वचन घेतले. त्या माणसाने नबुखद्नेस्सराशी निष्ठेन राहण्याचे वचन दिले. नबुखद्नेस्सरने मग त्याला यहूदाचा नवा राजा केला. मग त्याने यहूदातील सर्व सामर्थ्यवान पुरुषांना यहूदापासून दूर नेले.
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की नवा राजा बाबेलमध्येच मरेल. नबुखद्नेस्सरने ह्या माणसाला यहूदाचा नवा राजा केले. पण त्या माणसाने नबुखद्नेस्सरला दिलेले वचन मोडले. त्याने कराराकडे दुर्लक्ष केले.
परमेश्वर, माझा प्रभू, अशी प्रतिज्ञा करतो, “माझ्या प्राणाशपथ मी यहूदाच्या राजाला शिक्षा करीन. का? कारण त्याने माझ्या ताकिदींकडे लक्ष दिले नाही. त्याने आमचा करार मोडला.