तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?” आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”
Cross references
या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.
हे दोघे, पलिष्टी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात आले. ते सैनिक म्हणाले, “पाहा, ते बिळात लपून राहिलेले इब्री आता बाहेर पडत आहेत.”
माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कधीही किंतू उदभवणार नाही.
दावीद त्या पलिष्ट्यांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.
शेवटी ते सर्व म्हणू लागले, “दानीएलाला त्याच्या चुकीबद्दल दोषी ठरविणे आम्हाला कधीच जमणार नाही. तेव्हा त्याच्या देवाच्या नियमांच्या संदर्भात आम्हाला तक्रार करण्याजोगे काहीतरी शोधले पाहिजे.”
मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!” पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवणयास कोणतेही कारण मला दिसत नाही.”
कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा.
पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.