शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस?
Cross references
परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत!अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.
इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तरी मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.”
देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
शत्रूप्रमाणे परमेश्वराने धनुष्याला बाण लावला. त्याने स्वत:ची तलवार उजव्या हातात धरली. यहूदाचा शत्रू असल्याप्रमाणे देवाने यहूदातील देखण्या पुरुषांना ठार केले. सियोनच्या तंबूवर परमेश्वराने आपला राग ओकला.
परमेश्वर शत्रूप्रमाणे वागला. त्याने इस्राएल गिळले. त्याने तेथील सर्व राजवाडे, गड गिळंकृत केली. यहूदाच्या कन्येमधे त्याने मृतासाठी खूप शोक आक्रंदन निर्माण केले.
हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर! संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा! तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविलेत्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.”
त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे देवाच्या पवित्र लोकांचे आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचेदिसून आले.”