Home Bibles 1 शमुवेल 19:1 · मराठी बायबल
1 शमुवेल 19:1 · मराठी बायबल

शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.

Cross references

उत्पत्ति 37:18

योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले.

1 शमुवेल 18:1

शौलशी चाललेले दावीदचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदवर तो स्वत:इतकेच प्रेम करु लागला.

1 शमुवेल 18:3

योनाथानचे दावीदवर अपार प्रेम होते. त्याने दावीदशी एक करार केला.

1 शमुवेल 18:9

तेव्हा पासून तो दावीदकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.

1 शमुवेल 18:25

शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदचा काटा काढतील असे त्याला वाटले.

1 शमुवेल 20:1

दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”

1 शमुवेल 20:19

या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा.

2 शमुवेल 4:8

ते हेब्रोन येथे पोचले. आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले.रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शिक्षा केली.”

Interlinear

Choose Theme