Home Bibles 1 शमुवेल 17:43 · मराठी बायबल
1 शमुवेल 17:43 · मराठी बायबल

तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली.

Cross references

उत्पत्ति 27:29

सर्व लोक तुझी सेवा करोत; राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत; तू तुझ्या भावांवर राज्य करशील; ते तुला वंदन करतील व तुझ्या आज्ञा पाळतील; तुला शाप देणारे शापित होतील आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादित होतील.”

गणना 22:6

ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”

गणना 22:11

तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन.आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”

शास्ते 9:27

एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.

1 शमुवेल 24:14

तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इस्राएलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निळळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला.

1 शमुवेल 24:15

परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करु द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करु द्या. मला पठिंबा देवून माझेच खरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”

2 शमुवेल 3:8

या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही.पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस.

2 शमुवेल 9:8

मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, “मेलेल्या कुत्र्याला एवढीही माझी किंमत नाही. पण आपण या सेवकावर कृपादृष्टी करत आहात.”

2 शमुवेल 16:9

सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्यासारख्या नगण्य माणसाने तुम्हाला शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करु द्या.”

2 राजे 8:13

हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!”अलीशा म्हणाल, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”

नीतिसूत्रे 26:2

एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात.

Interlinear

Choose Theme