Home Bibles 1 शमुवेल 1:4 · मराठी बायबल
1 शमुवेल 1:4 · मराठी बायबल

एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई.

Cross references

लेवीय 3:4

दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व अर्पावे।

लेवीय 7:15

शांत्यर्पणासाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काहीही सकाळपर्यत ठेवू नये.

अनुवाद 12:5

तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

अनुवाद 12:17

आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.

अनुवाद 16:11

परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.

Interlinear

Choose Theme