Home Bibles 1 राजे 9:26 · मराठी बायबल
1 राजे 9:26 · मराठी बायबल

एसयोन गेबेर येथे शलमोनाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.

Cross references

गणना 33:35

अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.

अनुवाद 2:8

“तेव्हा एसावचे वंशज राहात असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन - गेबर वरुन येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबच्या रानातल्या रस्त्याला आपण वळलो.

1 राजे 22:48

राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.

1 राजे 22:49

इस्राएलचा राजा अहज्या याने यहोशाफाटला मदतीचा हात दिला. त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली. पण अहज्याची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटने नकार दिला.

2 राजे 14:22

राजा अमस्याच्या निधनानंतर त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.

2 इतिहास 8:11

शलमोनाने फारोच्या मुलीला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा करारकोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या बायकोने दावीद नगरात राहू नेये.”

2 इतिहास 8:17

यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एस्योन - गेबेर आणि एलोथ या नगरांना गेला.

नीतिसूत्रे 31:14

ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते.

Interlinear

Choose Theme