Home Bibles 1 राजे 7:36 · मराठी बायबल
1 राजे 7:36 · मराठी बायबल

पालखीची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीवकाम पितळेत केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.

Cross references

1 राजे 6:29

दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.

1 राजे 6:32

जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.

1 राजे 6:35

कारागिरांनी दोन दरवाजे केले आणि प्रत्येक दार दोन झडपांचे होते त्यामुळे ते दुमडले जात असे. त्यावरही पुन्हा करुब देवदूत, खजुरीची झाडे, फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने आच्छादली होती.

1 राजे 7:29

पत्रे आणि चौकट यांच्यावर पितळी सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.

यहेज्केल 40:31

दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या.

यहेज्केल 40:37

आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.

यहेज्केल 41:18

तेथे करुब देवदूतांच्या आकृती आणि खजुरीची झाडे कोरलेली होती. करुब देवदूतांच्यामध्ये खजुरीचे झाड कोरलेले होते. प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.

यहेज्केल 41:25

इतर भिंतीप्रमाणे मधल्या दालनाच्या (पवित्र जागेच्या) दारांवर, करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूच्या दर्शनी भागावर लाकडाचे आच्छादन होते.

Interlinear

Choose Theme