दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
Cross references
तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
“तेव्हा मी असे सुचवतो. तुम्ही दानपासून बैरशेबापर्यंत समस्त इस्राएल लोकांना एकत्र आणा. म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा.
तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दान पासून बैरशेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
पण हिज्कीयाचे ऐकू नका.“कारण अश्शूरचा राजा म्हणतो ‘माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
“तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही.
प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक आपल्या मित्रांबरोबर व शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील. ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”