Home Bibles 1 राजे 21:24 · मराठी बायबल
1 राजे 21:24 · मराठी बायबल

तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.”‘

Cross references

1 राजे 14:11

तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.”

1 राजे 16:4

तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”

यशया 14:19

पण, हे दुष्ट राजा, तुला तुझ्या थडग्याच्या बाहेर टाकले आहे. तू झाडाच्या तोडलेल्या फांदीप्रमाणे आहेस. लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकाला बाकीचे सैनिक तुडवून जातात तशी तुझी स्थिती आहे. आता तुझ्यात व इतर कलेवरात काहीही फरक नाही तुला कफनात गुंडाळले आहे.

यिर्मया 15:3

मी त्यांच्यावर ‘चार प्रकारचे संहारक सोडीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘मी त्यांना मारण्यासाठी तलवारधारी शत्रू पाठवीन. त्यांची शवे खेचून नेण्यासाठी मी कुत्र्यांना पाठवीन. त्यांची प्रेते खाण्यासाठी मी पक्षी व हिंस्र प्राणी सोडीन.

यहेज्केल 32:4

मग मी तुला कोरड्या जमिनीवर टाकीन. मी तुला शेतांत टाकीन. सर्व पक्षी येऊन तुला खाऊ देत. सर्व ठिकाणचे सगळे हिंस्र प्राणी येऊन तुला खाऊन तृप्त होऊ देत.

यहेज्केल 39:18

शक्तिशाली सैनिकांचे मांस तुम्ही खाल. जागातिक नेत्यांचे रक्त तुम्ही प्याल. ते एडके, मेंढ्या, बोकड व बाशानमधील पुष्ट बैलांसारखे आहेत.

प्रकटीकरण 19:18

म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांलाखावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचेमांस तुम्हांला खावयाला मिळेल.”

Interlinear

Choose Theme