Home Bibles ☰ Books 1 राजे 2:35 · मराठी बायबल
1 राजे 2:35 · मराठी बायबल

यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली.

Cross references

गणना 25:11

“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.

1 शमुवेल 2:35

मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील.

1 राजे 1:26

“पण मी, सादोक याजक यहोयादाचा मुलगा बनाया आणि तुमचा मुलगा शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.

1 राजे 1:33

राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा.

1 राजे 1:38

सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.

1 राजे 2:27

परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.

1 राजे 4:4

बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता.सादोक आणि अब्याथार याजक होते

1 इतिहास 6:4

एलाजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा.

1 इतिहास 6:50

अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.

1 इतिहास 24:3

प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या

1 इतिहास 27:5

तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती.

1 इतिहास 29:22

मग परमेश्वासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला.दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला.राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.

एज्रा 7:2

हिल्कीया शल्लूमचा, शल्लूम सादोकाचा, सादोक अहीटूबचा,

ईयोब 34:24

“शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही. तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.

स्तोत्रसंहिता 109:8

माझ्या शत्रूला लवकर मरु दे. त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.

Interlinear

Choose Theme