सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, “एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता.”तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल.”
Cross references
“एक नवीन गाडी तयार करुन नुकत्याच व्यायलेल्या दोन गाई तिला जुंपा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्यांच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आणून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका.
पलिष्ट्यांनी हा सल्ला मानून त्या प्रमाणे सर्व काही केले. नुकत्याच व्यालेल्या दोन गाई त्यांनी मिळवल्या. त्यांना गाडीला जुंपून वासरे गोठ्यात ठेवली.
नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.
लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.
लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल व तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”
तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, “पाऊस पडेल’ आणि तेच घडते.