1 राजे 16:22 · मराठी बायबल
तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला.
Cross references
2 राजे 8:26
त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेममध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी.
होशेय 7:7
ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला. त्यांचे सर्व राजे पडले पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”