Home Bibles 1 राजे 15:15 · मराठी बायबल
1 राजे 15:15 · मराठी बायबल

आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.

Cross references

1 राजे 7:51

परमेश्वाच्या मंदिराचे हे काम शलमोनाने स्वत:च्या पसंतीप्रमाणे करवून घेतले. मग आपले वडील दावीद यांनी या हेतून राखून ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. त्या सर्व मंदिरात आणल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यात ही सोन्यारुप्याची चीजवस्तू जमा केली.

1 इतिहास 26:26

दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.

2 इतिहास 14:13

आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.

2 इतिहास 15:18

मग त्याने व त्याच्या वडलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.

Interlinear

Choose Theme