Home Bibles 1 राजे 14:22 · मराठी बायबल
1 राजे 14:22 · मराठी बायबल

यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.

Cross references

अनुवाद 4:24

कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.

अनुवाद 29:28

क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?

अनुवाद 32:16

परमेश्वराच्या या प्रजेने इतर दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि परमेश्वराची इर्ष्या जागवली. मूर्ती त्याला मान्य नाहीत, तर या लोकांनी मूर्ती केल्या व परमेश्वराचा कोप ओढवला.

शास्ते 3:7

इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले.

शास्ते 3:12

पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले.

शास्ते 4:1

एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.

1 राजे 14:9

पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.

1 राजे 16:30

परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.

2 राजे 17:19

पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.

2 राजे 21:11

“यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यांपेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीमुळे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.

2 इतिहास 12:1

रहबामचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.

2 इतिहास 12:14

रहबामने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.

स्तोत्रसंहिता 78:58

इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.

यशया 65:3

ते लोक माझ्यासमोर असे वागून मला राग आणतात. ते त्यांच्या खास बागांत होमार्पण अर्पण करतात आणि धूप जाळतात.

यिर्मया 3:7

मी स्वत:शीच म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करुन झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. इस्राएलने काय केले हे इस्राएलच्या विश्वासघातकी बहिणीने यहूदाने पाहिले.

यिर्मया 7:26

पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली.

यहेज्केल 16:47

त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस.

1 करिंथकरांस 10:22

आपण प्रभूला ईर्षेस पेटाविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही.

Interlinear

Choose Theme