मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.”
Cross references
तिसऱ्या दिवशी तिथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छापणीतला होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. सरळ दावीदापाशी येऊन त्याने लोटांगण घातले.
पण राजा दावीद म्हणाला, “अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे. त्याला मला भेटता मात्र येणार नाही.” तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.
यरुशलेम मध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत राजा दावीदाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.
तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.
बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकाशी केली.
बथशेबाने हे ऐकून राजाला वंदन केले व म्हणाली “राजा चिरायु होवो.”
मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.