Home Bibles 1 राजे 1:47 · मराठी बायबल
1 राजे 1:47 · मराठी बायबल

राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता.

Cross references

उत्पत्ति 47:31

मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा;” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली; मग इस्राएलाने (याकोबाने) आपले डोके मागे पलंगाच्या उशाकडे नम्रतेने लववून नमन केले.

निर्गम 12:32

आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमची शेरमेढरे, व गुरेढोरे ही तुमच्या बरोबर घेऊन जा. येथून निघा! आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या!”

2 शमुवेल 8:10

तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला राजा दावीद याच्याकडे पाठवले. हददेजरशी लढाईकरुन त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करुन त्याला आशीर्वाद दिले. (हददेजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या.

2 शमुवेल 21:3

दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्या साठी मी काय करु?“इस्राएलचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करु शकतो?”

1 राजे 1:37

महाराज, आपल्याला परमेश्वराची साथ आहे. तो परमेश्वर असाच शलमोनाच्याही पाठीशी उभा राहील अशी मला आशा आहे. राजा शलमोनच्या राज्याची भरभराट होवो आणि माझे स्वामी, आपल्यापेक्षा ते अधिक बळकट होवो.”

एज्रा 6:10

स्वर्गातील देवाला प्रसन्न करणारे होम या यहूदी याजकांनी अर्पण करावे आणि त्यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी म्हणून त्यांना जे जे लागेल ते सर्व द्या.

स्तोत्रसंहिता 20:1

जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो.

लूक 19:38

ते म्हणाले, “‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”

इब्री लोकांस 11:21

विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.

Interlinear

Choose Theme