Home Bibles 1 राजे 1:3 · मराठी बायबल
1 राजे 1:3 · मराठी बायबल

आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.

Cross references

यहोशवा 19:18

त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम,

1 शमुवेल 28:4

पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला.

1 राजे 2:17

अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”

2 राजे 4:8

एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.

2 राजे 4:25

परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली.अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, “बघ, ती शूनेमची बाई येतेय

एस्तेर 2:2

तेव्हा राजाच्या व्याक्तिगत सेवेतील सेवकांनी सुचवले, “राजासाठी तरुण, सुंदर कुमारीकांचा शोध घ्यावा.

एस्तेर 2:4

त्यांच्यामधून मग जी मुलगी राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या ऐवजी राणीपद मिळावे.” राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.

Interlinear

Choose Theme