अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त याजगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे.
Cross references
शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वत:चे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल.
म्हणून मी तुम्हांला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभु आह,” असे म्हणू शकत नाही.
आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे.तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.
आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तोदेवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आलाआहे.
प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीतिकरतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो.