Home Bibles 1 योहान 3:11 · मराठी बायबल
1 योहान 3:11 · मराठी बायबल

आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे.

Cross references

योहान 13:34

‘मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.

योहान 15:12

जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे.

गलतीकरांस 6:2

एकमेकांची ओझी वाहा.अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

इफिसकरांस 5:2

आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.

1 थेस्सलनीकाकरांस 4:9

आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे.

1 तीमथ्याला 1:5

आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंत:करणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते.

1 पेत्र 1:22

आता तुम्ही स्वत:ला शुद्ध केले आहे. सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा. एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या.

1 पेत्र 3:8

शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.

1 पेत्र 4:8

सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.

1 योहान 1:5

आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाशआहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही.

1 योहान 2:7

प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यातआली होती.

1 योहान 4:7

प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण

1 योहान 4:21

आम्हांलाख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.

2 योहान 1:5

आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवीआज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुलादेण्यात आलेली होती,

Interlinear

Choose Theme