Home Bibles 1 करिंथकरांस 9:24 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 9:24 · मराठी बायबल

तुम्हांला माहीत नाही का मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षिस मिळते? अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल.

Cross references

स्तोत्रसंहिता 19:5

सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो. सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखाद्या धावपटू सारखी करतो.

उपदेशक 9:11

मी या आयुष्यात योग्य नसलेल्या आणखीही काही गोष्टी पाहिल्या. सगव्व्यांत जोराने धावणारा धावपटू शर्यत जिंकत नाही: सर्वशक्तीमान सैन्य नेहमीच लढाई जिंकते असे नाही. सर्वांत शहाण्या माणसाला त्याने कमावलेले अन्न नेहमीच खाता येते असे नाही. खूप हुशार असलेल्या माणसाला संपत्ती मिळते असे नाही आणि सुशिक्षित माणसाला त्याच्या योग्य अशी स्तुती नेहमी लाभत नाही. वेळ आली की त्या सर्वांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात.

यिर्मया 12:5

“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील?

होशेय 12:10

मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.

1 करिंथकरांस 9:26

यास्तव मी अनिश्चितपणे नाही तर ज्याला ध्येय आहे अशासारखा धावतो, तसेच जो कोणी नुसताच वाऱ्यावर प्रहार करीत नाही, तसे मी मुष्टीयुद्ध करतो.

गलतीकरांस 2:2

मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मीखाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊनये.

गलतीकरांस 5:7

तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला?

फिलिप्पैकरांस 2:16

तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा.

फिलिप्पैकरांस 3:14

ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.

कलस्सैकरांस 2:18

कोणीही जो स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंत:करणामुळे गर्वाने फुगलेला असतो.

2 तीमथ्थाला 4:7

मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे.

इब्री लोकांस 12:1

म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू.

याकोब 1:12

धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे.

प्रकटीकरण 3:11

“मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये.

Interlinear

Choose Theme