Home Bibles 1 करिंथकरांस 8:2 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 8:2 · मराठी बायबल

जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते.

Cross references

नीतिसूत्रे 26:12

जर एखादा माणूस शहाणा नसताना स्वत:ला शहाणा समजत असेल तर तो मूर्खापेक्षाही वाईट आहे.

नीतिसूत्रे 30:2

मी पृथ्वीवरचा सगळ्यात वाईट माणूस आहे, मी जितके समजून घ्यायला हवे होते तितके मी समजू शकत नाही.

रोमकरांस 11:25

परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशत: कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.

1 करिंथकरांस 3:18

कोणीही स्वत:ला फसवू नये. जर कोणी स्वत:ला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.

1 करिंथकरांस 13:8

ती नेहमी विश्वास ठेवते. आशा धरते. नेहमी सहन करते. प्रीति कधी संपत नाही. पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल.

1 करिंथकरांस 13:12

आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशत:कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन,

गलतीकरांस 6:3

कारण जर कोणी स्वत:ला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी,तर तो स्वत:जी फसवणूक करुन घेतो.

1 तीमथ्याला 1:5

आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंत:करणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते.

1 तीमथ्याला 6:3

जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभु याची जी निकोप वचने आणि देवाच्या सेवेचे खरे शिक्षण मान्य करीत नाही

Interlinear

Choose Theme